यवतमाळमध्ये गुंडाच्या साथीदाराला महिलांनी चोपले

जिल्ह्यातल्या घाटंजी इथे गुंडाची प्रचंड दहशत आहे. महिला मुलींवर अत्याचाराचे प्रकार नित्याचे झालेत. घाटंजीमधल्या अमोल ऊर्फ भयानक नावाच्या गुंडाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्याच्या साथीदाराला महिलांची चांगलेच चोपले.

Updated: Jul 11, 2014, 10:37 PM IST
यवतमाळमध्ये गुंडाच्या साथीदाराला महिलांनी चोपले title=

यवतमाळ : जिल्ह्यातल्या घाटंजी इथे गुंडाची प्रचंड दहशत आहे. महिला मुलींवर अत्याचाराचे प्रकार नित्याचे झालेत. घाटंजीमधल्या अमोल ऊर्फ भयानक नावाच्या गुंडाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्याच्या साथीदाराला महिलांची चांगलेच चोपले.

या संतापजनक कृत्याविरोधात महिला संतापल्या होत्या. अटक झालेल्या या अमोल ऊर्फ भयानकला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी महिलांनी मोर्चा काढला. त्याचवेळी या महिलांवर बलात्का-याचा साथीदार तलवार घेऊन धावून आला. त्यावर महिलांनीही दुर्गावतार धारण करत त्याला बेदम चोप दिला.
 
पोलीस या विभागातील गुंडांना रोखण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. घाटंजीमध्ये अनेक अवैध धंदे सुरू आहेत. त्यांना पोलिसांचं अभय असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.