बीड : बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या चांगलच अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना फरार घोषीत करण्यात येणार आहे.
बीडमधल्या अंबाजोगाई कोर्टामध्ये या प्रकरणाची चार्जशीट दाखल आहे. यामध्ये धनंजय मुंडे, रजनी पाटील आणि भाजपचे नेतेही आरोपी आहेत. या आरोपींच्या अटकेचे आदेश देण्यात आलेले आहेत.
असे आदेश असले तरीही पोलिसांना हे आरोपी सापडलेले नाहीत, म्हणून या सगळ्यांना फरार घोषीत करण्यात येणार आहेत. बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी एकूण 93 जणांना फरार घोषीत केलं जाणार आहे. या बँकेत 142 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.