हर्षी गावातील ही व्यथा.. मुला-मुलींचं लग्न कसं होणार?

दुष्काळानं शेतकरी देशोधडीला लागलाय, त्यासोबत आता अनेक सामाजिक समस्या सुद्धा ग्रामीण भागात निर्माण होतंय. त्यात एक मोठी समस्या आहे लग्नाची.. मुलींच्या लग्नाला पैसै नाहीतच त्यासोबत आता शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देण्यासही लोक धजावत नाहीये. 

Updated: Jan 15, 2015, 11:46 PM IST
हर्षी गावातील ही व्यथा.. मुला-मुलींचं लग्न कसं होणार? title=

औरंगाबाद: दुष्काळानं शेतकरी देशोधडीला लागलाय, त्यासोबत आता अनेक सामाजिक समस्या सुद्धा ग्रामीण भागात निर्माण होतंय. त्यात एक मोठी समस्या आहे लग्नाची.. मुलींच्या लग्नाला पैसै नाहीतच त्यासोबत आता शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देण्यासही लोक धजावत नाहीये. 

दुष्काळ शेतकऱ्यांच्या जीवावर घाव घालतोच त्याचबरोबर अनेक समस्याही निर्माण होत आहेत. त्याचे परिणाम शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही भोगावे लागत आहेत. नापिकीमुळं पैसे हातात नाहीत. पिण्याच्या पाण्याची होरपळ. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नावर होत आहे. त्यामुळं प्रत्येक गावात तरूणांचे असे घोळके रिकामे असल्याचं चित्र दिसतंय. मुलांच्या हाताला काम नाही, कित्येकांचं शिक्षण सुटलंय. वयही वाढतंय. पालक आणि मुलं सगळेच वैतागले आहेत. शहरात एखाद्या कामगाराला मुलगी मिळेल, पण शेतकऱ्याच्या मुलाला लग्नासाठी मुलगी मिळणं दुरापास्त झालंय. गावातल्या सोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 

दुष्काळाची ही दुसरी बाजू आहे. पिढ्यांचं नुकसान होतंय. सामाजिक घडी विसकटतेय. त्यामुळं शेतकऱ्यांना मदत करताना ही परिस्थितीही बदलण्याच्या दिशेनं पावलं उचलणं गरजेचं आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.