कोंढव्यात इंजीनिअरिंग तरुणीची आत्महत्या

मित्राने भेटण्यासाठी वेळ दिला नाही म्हणून पुण्यात इंजीनिअर तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. जुही गांधी असं या 23 वर्षीय तरुणीचं नाव आहे. 

Updated: May 17, 2017, 05:07 PM IST
कोंढव्यात इंजीनिअरिंग तरुणीची आत्महत्या title=

पुणे : मित्राने भेटण्यासाठी वेळ दिला नाही म्हणून पुण्यात इंजीनिअर तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. जुही गांधी असं या 23 वर्षीय तरुणीचं नाव आहे. 

कोंढव्यातील सुमा सिल्व्हर सोसायटीत ही घटना घडलीय. जुही बंगळुरुच्या अॅसेंचर या आयटी कंपनीत नोकरीला होती. मित्राला भेटण्यासाठी ती पुण्यात आली होती. 

मंगळवारी जुही मित्राला भेटण्यासाठी त्याच्या सुमा सिल्व्हर सोसायटीत गेली. मात्र आपला पेपर असून नंतर भेटू असं त्यानं तिला सांगितलं. त्यामुळे मित्र राहत असलेल्या याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन जुहीने उडी मारुन जीवनप्रवास संपवलाय. कोंढवा पोलीस या प्रकरणी तपास करतायत.