जळगाव : नियमबाह्य कर्जमाफी दिल्या प्रकरणी रिझर्व्ह बँकेनं जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेला दणका दिलाय. रिझर्व्ह बँकेंनं जेडीसीसीवर दोन लाख रुपयांची दंडांत्मक कारवाई केलीय.
जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालकांशी संबंधीत असलेल्या जळगाव स्टार्च फॅक्टरीला जिल्हा बँकेंनं कर्जमाफी दिली होती. या निर्णयामुळं बँकिंग कायद्याचं उल्लंघन झालं असून रिझर्व्ह बँकेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
रिझर्व्ह बँकेनं जिल्हा बँकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली. त्याला जिल्हा बँकेनं लेखी उत्तर दिलं. मात्र रिझर्व्ह बँकेचं समाधान न झाल्यामुळं दंड ठोठावण्यात आलाय.