कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्या नंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही जण बनावट कागदपत्रांचा वापर करू शकतील अशी शक्यता सूरवातीपासूनच व्यक्त केली जात होती. पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये राहणाऱ्या कमलेश गढवाल यांना काहीसा असाच अनुभव आलाय.
गेली ४० वर्ष पुण्यात राहणाऱ्या कमलेश यांचा अंबेजोगाईशी कसलाही संबंध नसताना त्यांच्या मोबाईलवर अंबेजोगाई मधल्या दीनदयाळ नागरी सहकारी बँक लिमिटेडमध्ये खात उघडल्याचा मेसेज आला. तो ही १६ तारखेला. एवढंच नाही तर या बँक खात्यामध्ये सुरुवातीला ५०० आणि नंतर ४५ हजार ८१४ रुपये जमा केल्याचा संदेश आला. त्यानंतर या खात्यातून १० हजार काढण्यात हे आले.
अंबेजोगाईशी कसलाही संबंध नसताना मेसेज आलेच कसे, कागदपत्रांचा गैर वापर तर होत नाही ना अशी भीती त्यांना वाटत आहे.