तूर खरेदी केंद्रावर गेल्या शेतकऱ्याचा चक्कर येऊन पडून पाय फ्रॅक्चर

राज्यात तूर खरेदी  केंद्र बंद झाल्याचा सगळ्यात मोठा फटका औरंगाबादमधल्या पैठणच्या  रंगनाथ आल्हाट या 75 वर्षाच्या शेतक-याला बसलाय..... 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 24, 2017, 04:39 PM IST
तूर खरेदी केंद्रावर गेल्या शेतकऱ्याचा चक्कर येऊन पडून पाय फ्रॅक्चर   title=

पैठण : राज्यात तूर खरेदी  केंद्र बंद झाल्याचा सगळ्यात मोठा फटका औरंगाबादमधल्या पैठणच्या  रंगनाथ आल्हाट या 75 वर्षाच्या शेतक-याला बसलाय..... 

केंद्र बंद झाल्यानंतरही सुरु होईल या प्रतीक्षेत रंगनाथ पैठणच्या तूर खरेदी केंद्राबाहेर गेले दोन दिवस बसून राहिले..... 

त्यात काल या वृद्ध शेतक-याला दुपारी चक्कर आल्यानं ते पडले आणि त्यांच्या पायाला फ्रँक्चर झालं. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.  

आधीच तूर विकली गेली नसल्यानं त्यांच्या कडे पैसै नाहीत, त्यात आता उपचाराचा खर्चही त्यांना पेलावणारा नाही.