मुंबई : महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प २०१६-१७ सादर केला. यात त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी विविध योजनांवर अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतूदी वाचून दाखवल्या. पाहा, या अर्थसंकल्पात तुमच्या शहरासाठी किंवा गावासाठी काय आहे... .
- शिर्डी, कराड, अमरावती, अकोला, सोलापूर, विमानतळांचा विकास करणार
- प्रलंबित रेल्वे मार्गांसाठी ६८ कोटी
- कोस्टल रोडसाठी, मुंबई मेट्रोसाठी ९० कोटींची तरतूद
- एसटीच्या १३ स्थानकांचं आधुनिकीकरण
- महाराष्ट्रभरात पुढच्या आठ वर्षांत २१ हजार किलोमीटर रस्ते बांधणार
- रस्ते बांधणीसाठी ४ हजार ५० कोटींची तरतूद
- भिवंडी, कल्याण, शिळफाटा उन्नत मार्ग उभारणार
- दर १०० किलोमीटरवर स्त्रियांसाठी स्वच्छतागृह उभारणार
- स्वच्छतागृह बांधणीसाठी ५० कोटी
- मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली पुण्यात तेजस्विनी बसेस
- महिलांसाठी ३०० तेजस्विनी बसेस राज्यसरकार देणार
- महिला नोकरदारांसाठी तेजस्विनी बसेस
- पोलिसांच्या घरांसाठी ३२० कोटी
- शहरांमध्ये सीसीटीव्हीसाठी ३५० कोटी
- चंद्रपूर : नवीन चंद्रपूर विकासासाठी १०० कोटी.. चंद्रपूर शहराच्या विकासासाठी म्हाडाची स्थापना
- पुणे व नागपूर : मेट्रोसाठी १८० कोटी रुपयांची तरतूद
- पुणे : जलसाक्षरतेसाठी यशदामध्ये पुण्यात कायमस्वरुपी केंद्र उभारणार
- अमरावती : जलसाक्षरतेसाठी अमरावतीमध्ये उपकेंद्र स्थापन करणार
- पंढरपूर : नमामि चंद्रभागा अभियानासाठी २० कोटींची तरतूद... २०२२ पर्यंत चंद्रभागा प्रदूषणमुक्त करणार.
- सांगली : आर. आर. पाटलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सांगलीत सभागृह... ५ कोटी
- जळगाव : जळगावात 'भास्कराचार्य गणित नगरी' उभारणार
- जळगाव व अकोला : प्रत्येकी एक अशी दोन नवीन पशू महाविद्यालये सुरू करणार
- जळगाव : जळगावमध्ये नवं कृषी उद्यान उभारणार
- अमरावती : अमरावतीच्या हनुमान व्यायाम संस्थेसाठी १ कोटी
- मराठवाडा आणि विदर्भ : शेतकऱ्यांना वीज सवलत
- पालघर : पालघरमध्ये एकलव्य क्रिडा प्रबोधिनी... २५ कोटींची तरतूद
- रायगड : मांडवा रो-रो सेवेसाठी ३० कोटींची तरतूद