खानदेशात अतिवृष्टीनंतर भीषण स्थिती, तात्काळ मदत नाही

खानदेशात ८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने अनेक गरीब कुटूंबांची वाताहत होत आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने खाण्यापिण्याचं साहित्य, आणि जनावरं पुरात वाहून गेली आहेत. शेतातील पिकांवर तर पुराचा गाळ फिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. 

Updated: Sep 9, 2014, 08:01 PM IST
खानदेशात अतिवृष्टीनंतर भीषण स्थिती, तात्काळ मदत नाही title=

जळगाव : खानदेशात ८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने अनेक गरीब कुटूंबांची वाताहत होत आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने खाण्यापिण्याचं साहित्य, आणि जनावरं पुरात वाहून गेली आहेत. शेतातील पिकांवर तर पुराचा गाळ फिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. 

खानदेशात एवढं मोठं नुकसान होवूनही प्रशासनाने तात्काळ कोणतीही मदत दिलेली नाही, एकीकडे खानदेशचा मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षा ठेवणाऱ्या या प्रांताचं पूरग्रस्ताचं दु:ख शासन दरबारी मांडतांना कुणीही दिसून येत नाहीय. 

२ हजार घरं वाहून गेली, आदिवासी वाऱ्यांवर
जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोघांचा मृत्यू झाला तर सुमारे २ हजार घरांची पडझड झालीय. नदी नाल्यांचे प्रवाह बदलल्याने उभ्या पिकांची शेती खरवडली गेली, पुरामुळे अनेकांची घरे होत्याची नव्हती झाली, ममुराबाद मधील आदिवासी वस्तीतील ४५ कुटुंबे उघड्यावर आलीय. त्यामुळे एका वेळच्या जेवणालाही बेजार झालेल्या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी गावातीलच एका दानशूर व्यक्तीन मदतीचा हात पुढे केला, प्रशासन मात्र अजूनही कागदी घोडे नाचावान्यातच मग्न आहे .

४५ आदिवासी कुटुंब रस्त्यावर
जळगावसह, एरंडोल  , जामनेर , रावेर , भुसावळ , या तालुक्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. तापी गिरणा आणि वाघुर नद्या दुथडी भरून वाहत होत्या.यामुळे अनेक गावांना पुराचा तडाखा बसला, नदी नाल्यांचे प्रवाह बदलले, यामुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालंय २ हजार घरांवर छतच राहिले नाही, ममुराबाद येथील आदिवासी वस्तीतील ४५ घरांना जवळच्याच नाल्याच्या पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय. यामुळे २५० गावकऱ्यांनी कसाबसा आपला जीव तर वाचविला मात्र घरातील अन्यधान्य, भांडीकुंडी, जनावरे पाण्यात वाहून गेली, पुरामुळे संपूर्ण वस्ती भुईसपाट झालीय, एका वेळच्या जेवणाचे वांदे इथल्या पूरग्रस्तांना झाललेय. 

सरकार उदार नसलं तरी एकाने वाटले चार पोते गहू
दोन दिवसांपासून गावकऱ्यांची उपासमार होत असताना प्रशासनाने या पूरग्रस्तांची कोणतीही दखल घेतली नाही अखेर गावातीलच हेमंत गोविंद या दानशुराने ४ पोती गहू या वस्तीत वितरीत करून पूरग्रस्तांचे अश्रू पुसले. दरम्यान सर्व पूरबाधितांना तातडीन सरकारी मदत देण्याच आश्वासन प्रशासनाने दिलेय.  

गारपीट, वादळ, अतिवृष्टी हे नित्याचेच झालेय, या नैसर्गिक प्रलयात नुकसान झालेल्या लोकांना मात्र तटपुंजी मदत प्रशासनाकडून मिळते, या प्रलयात झालेल्या नुकसानातून मात्र वर्षानुवर्षे ही कुटुंबे पुन्हा उभी राहू शकत नाही हे तितकेच खरे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.