गडचिरोली: स्वतःच्याच पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह पुरणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला, गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. मुळचा अहमदनगरचा असलेला अविनाश तगड असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे.
गडचिरोलीमध्ये तैनात असताना २०१४मध्ये अविनाश तगडनं गडचिरोलीतली आपली मैत्रीण एसिंथा पिल्लई हिच्याशी साध्या पद्धतीनं लग्न केलं. दरम्यान घरच्यांच्या दबावानंतर अविनाश तगडनं २०१५ मध्ये अहमदनगरमध्ये दुसरं लग्न केलं. त्याची कुणकुण लागलेल्या एसिंथानं तगडला जाब विचारला. त्यावेळी झालेल्या भांडणात तगडनं एसिंथांचा गळा दाबून तिला मारुन टाकलं.
त्यानंतर तिचा मृतदेह घरात दोन दिवस ठेऊन नंतर तो मृतदेह निर्जन जागी पुरला. दरम्यान एसिंथाचा थांगपत्ता लागत नसल्यानं, तिच्या बहिण्यानं गडचिरोली पोलिसांत तक्रार केली. त्यावरुन तपास करताना, पोलीस उपनिरीक्षक तगड हाच दोषी असल्याचं आढळून आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.