प्रियकरासह आठ जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे या गावात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा प्रियकर पंकज गवई आणि त्याच्या आणि त्याच्या तिघा मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून आणखी चौघा नराधमांचा शोध सुरु आहे. 

Updated: Nov 26, 2014, 08:09 PM IST
प्रियकरासह आठ जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार title=

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे या गावात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा प्रियकर पंकज गवई आणि त्याच्या आणि त्याच्या तिघा मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून आणखी चौघा नराधमांचा शोध सुरु आहे. 

अमरावतीजवळील रहाटगावात राहणारी १६ वर्षाच्या मुलीची शाळेत ये-जा करताना बोरगाव धर्माळे इथं राहणाऱ्या पंकज गवईशी ओळख झाली आणि या ओळखीचं रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. काही दिवसांपूर्वी पंकजनं शाळेत जाण्यासाठी निघालेल्या पीडित मुलीला बळजबरी करत यवतमाळला नेलं आणि तिथं मित्रांच्या साथीनं तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.  

यानंतर लागोपाठ दोन दिवस पंकज आणि त्याच्या मित्रांनी पीडित मुलीला विविध ठिकाणी नेऊन तिच्या अत्याचार केले. बुधवारी पंकज आणि त्याचे मित्र पीडित मुलीला घेऊन एसटी बसमधून गावी परतत होते. एसटी कर्मचाऱ्याला या सर्वांवर संशय आला आणि त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी वडगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.