नवी मुंबई : पत्नी आणि तीन मुले असताना एका तरुणीबरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये गेली दहा वर्ष राहत असलेल्या एका व्यक्तीने आणखी एका तरुणीला आपल्या प्रेम जाळ्यात अडकविले. ही गोष्ट त्याच्या पहिल्या प्रेयसीला कळाले तेव्हा तिने त्याचा खून करून त्याला साताऱ्याच्या जंगलात नेऊन जाळल्याची धक्कादायक घटना घडली. हा व्यक्ती वाशीमध्ये संडे नावाचा बार चालवात होता.
कलवीर सिंह गुजर हा घाटकोपर येथे आपली पत्नी आणि तीन मुलांसोबत रहात होता, तसेच तो गेल्या दहा वर्षापासून रतन गायकवाड या तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होता, गुजर हा वाशी सेक्टर सतरामध्ये संडे बार चालवत होता, गुजरचे आणखी तिसऱ्या मुलीसोबत प्रेम संबंध आहेत अशी माहिती रतन उर्फ रितू ला कळले. रितूने गुजरचा काटा काढायचा ठरवला.
१५ ऑगस्टला रात्री गुजर रितूकडे आला. रितूने सर्व तयारी केली होती. गुजरचा खून करण्यासाठी तिने सहा जणांना सुपारी दिली होती. या सहा जणांनी गुजरला पकडून त्याच्या तोडावर उशी ठेऊन त्याची हत्या केली. या सहा जणांनी त्याचा मृतदेह त्याच्या गाडीतून नेऊन सातारा येथील जंगलात जाळला. गुजर हा तसाच होता त्याला बायकांचा नाद होता अशी माहिती संडे बारचा मालक गोडा याने दिली .
गुजर याची हत्या करून परतणाऱ्या सहा जणांना मृतदेह जाळून येत असताना, साताऱ्याच्या पोलिसांनी संशय येउन पकडले आणि या हत्येचा प्रकार समोर आला. सातारा पोलिसांनी या प्रकरणी रितू आणि हत्या करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.