मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून पोलिसांनी नवी शक्कल लढवली आहे. सुट्ट्या आणि विकेंडला एक्स्प्रेसवेवर गोल्डन अवर्स लागू करण्यात येणार आहे. या काळात अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असणार आहे. या नियमाची महामार्ग पोलिसांनी शनिवारपासून अंमलबजावणी सुरु केली आहे.
एक्स्प्रेस वेवरील अवजड वाहनांची वाहतूक जवळपास 5-6 तासांसाठी थांबवण्यात आली होती. यामुळं वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फायदा झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सुट्ट्यांच्या काळात आणि विकेंडला एक्स्प्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी असते. त्यामुळं अनेकदा अपघातही घडता. यावर गोल्डन अवर्सची संकल्पना पोलिसांनी शोधून काढली आहे.