नागपूर: नागपूरकरांसह संपूर्ण विदर्भवासीयांच्या अंगाची काहिली होत असतानाच, येत्या दोन ते तीन दिवसांत पारा चढतीवर राहणार असल्याचं नागपूर वेधशाळेनं सांगितलंय. नागपूरमध्ये आज 46.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
गेल्या चोवीस तासांत अख्ख्या विदर्भात तापमान चाळीस अंशांपलिकडे पोहोचलं होतं. तळपणारा सूर्य आणि भाजून निघणारं अंग, यामुळं विदर्भवासीय पुरते त्रासले आहेत. त्यामुळे त्यांचे डोळे आता मान्सूनकडे लागले आहेत. दरम्यान पावसाचं आगमन वेळेवरच होणार असल्याचं वेधशाळेनं सांगितलंय.
मे महिन्याच्या मध्यावर सूर्य अक्षरशः आग ओकू लागला आहे. विदर्भातलं चित्र तर भयंकर आहे. अमरावतीत सोमवारी 45.5 डिग्री सेल्सीयस इतक्या तापमानाची नोंद झाली. तर आज पारा 46 वर पोहोचला.
तर चंद्रपूरमध्ये आज यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. 46.8 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा पोहचला होता. तर परभणीमध्ये 45.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली.
अमरावतीसोबतच नागपूर, अकोला, धुळे, जळगाव या भागातही पारा वाढू लागला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.