मुंबई : मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महिलांवर हो़णाऱ्या अत्याचाराचा आणि मानसिक शोषण करणाऱ्या घटनांबद्दल खुलासा करणारे काही धक्कादायक आकडे जाहीर केलेत.
देशात महिलांवर होणारे अपराध वाढत आहेत. प्रत्येक दिवशी महिला या अत्याचाराची शिकार होत असते. यामध्ये, केवळ मुंबईत जवळपास ७५ टक्के महिलांवर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी किंवा पुरुषमित्रांनीच अत्याचार केल्याचं समोर आलंय.
जवळपास ७३ टक्के अत्याचाराचे आरोपी हे जवळचे नातलग म्हणजेच काका, मामा, लांबचा भाऊ आणि सावत्र वडील आहेत.
एका वृत्तानुसार ७६.६ टक्के पीडित व्यक्ती घटना घडून गेल्यानंतर ७२ तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांत तक्रार दाखल करण्यास तयार नसतात. केवळ १८५ घटनांमध्ये पीडितांनी ७२ तासांच्या आधीच पोलिसांत तक्रार दाखल केल्याचंही समोर आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.