सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाचा छापा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. 

Updated: Dec 26, 2016, 08:40 PM IST
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाचा छापा  title=

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. या बँकेतील कागद पत्रांची तपासणी सुरु केली असून बँकेत आयकर विभागाने पोलीस  बंदोबस्त ही तैनात केलाय. आयकरच्या 7 अधिकाऱ्यांच्या पथकाकडून जिल्हा बँकेची दुपार पासून तपासणी सुरु आहे.  

कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य लोकांना बॅंकेच्या बाहेर काढण्यात आलंय. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात 217 शाखा आहेत. 10 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत जुन्या नोटा भरुन घेण्याची मुदत सहकारी बँकांना देण्यात आली होती. या चार दिवसात सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या 217 शाखेत 305 कोटी रूपये जमा झाले होते. त्या पैकी 23 शाखांमधील व्यवहारांबाबत संशय व्यक्त होत असल्याने चौकशीची कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांची दिलीय.