महिलेनं भर कोर्टात जाळून घेतलं, महिलेची प्रकृती गंभीर

लातूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आज एका 50 वर्षीय महिलेनं स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर आहे.

Updated: Jun 18, 2015, 04:37 PM IST
महिलेनं भर कोर्टात जाळून घेतलं, महिलेची प्रकृती गंभीर   title=

लातूर: लातूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आज एका 50 वर्षीय महिलेनं स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर आहे.

लातूर तालुक्यातील धनेगाव इथली ही महिला आहे. राहीबाई सुरवसे असं या महिलेचं नाव असून ती जवळपास 95 टक्के इतकी भाजली आहे. दिवाणी न्यायालयातील जमिनीचा पुतण्यासोबत असलेल्या केसचा निकाल विरोधात गेल्यामुळं या महिलेनं पेटवून घेतल्याची पोलिसांनी सांगितलंय. 

रॉकेल ओतून या महिलेनं तिसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांवर पेटवून घेतल्यानंतर जिल्हा न्यायालय परिसरात मोठा गोंधळ उडाला. दररोजच्या कामकाजात व्यस्त असलेल्या वकिलांनाही नेमकं करावं काय? हे सूचत नव्हतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.