डाळीच्या साठेबाजांवर छापासत्र सुरूच, ठाण्यातून साडेसात कोटींचं धान्य जप्त

डाळींच्या वाढलेल्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशीदेखील सरकारचं छापासत्र सुरूच आहे. ठाणे पुरवठा विभागानं आज शीळ डायघर भागातल्या चामुंडा वेअर हाऊसवर छापा टाकून ७ कोटी ७४ लाख ५८ हजार ९६० रुपयांचं कडधान्य जप्त केलं. 

Updated: Oct 22, 2015, 06:42 PM IST
डाळीच्या साठेबाजांवर छापासत्र सुरूच, ठाण्यातून साडेसात कोटींचं धान्य जप्त title=

ठाणे: डाळींच्या वाढलेल्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशीदेखील सरकारचं छापासत्र सुरूच आहे. ठाणे पुरवठा विभागानं आज शीळ डायघर भागातल्या चामुंडा वेअर हाऊसवर छापा टाकून ७ कोटी ७४ लाख ५८ हजार ९६० रुपयांचं कडधान्य जप्त केलं. 

त्यात तूर डाळ, पांढरा वाटाणा, मसूर डाळ, उडीद यांचा समावेश आहे. डायघर पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केलाय. 

आणखी वाचा - महाराष्ट्र सरकारकडून २३ हजार मेट्रीक टन डाळ जप्त

यापूर्वी राज्य सरकारनं साठेबाजांवर केलेल्या कारवाईतून तब्बल १९० कोटींची २३ हजार ३०० मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात केली होती. एकट्या मुंबईतून २२ हजार मेट्रिक टन टाळ जप्त करण्यात आली असून त्याची किंमत १६५ कोटी इतकी आहे. 

दरम्यान, सरकारच्या या आक्रमक कारवाईविरोधात डाळ व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होतेय. यामुळे सहा हजार कोटींचे व्यवहार ठप्प असलल्याचं डाळ व्यापाऱ्यांच्या संघटेनेनं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.