पुणे : राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांकडे महावितरणचे १७ हजार कोटी रुपये थकले आहेत.
या रकमेच्या वसुलीसाठी महावितरणने नवीन योजना आणली आहे. त्याअंतर्गत १७ हजार कोटींमधील तीन हजार कोटींचे दंड आणि व्याज माफ केले जाणार आहे. तर मुद्दलाची रक्कम शेतकऱ्यांना १५ महिन्यात पाच हप्त्यात फेडायची आहे.
ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात या योजनेची माहिती दिली. शेतकऱ्यांकडून वीज बिलाची थकीत रक्कम वसूल झाल्यानंतर ती त्याच विभागात खर्च करण्यात येणार आहे.