अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : सरकारी परिपत्रक वाचण्यात तसं क्लिष्ट असतं, ते सामान्यांना वाचताना अडचण येते, पण अनेक वर्ष परिपत्रक वाचणाऱ्या सरकारी बाबूंनाही इंग्रजीतील हे पत्रक वाचता येत नाही, असं तुम्हांला सांगितलं, तर तुमचा विश्वास बसेल का... आता अशा एका परिपत्रकाची काहणी आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. केंद्राने महाबीजला एक परित्रक पााठविले त्याचा अर्थ महाबीजच्या अधिकाऱ्यांना कळलाच नाही. त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला गेला तो अभूतपूर्व होता.
केंद्राने काढलेलं परिपत्रकात सांगितले होते की बियाणे खरेदीसाठी ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चालणार आहेत, पण महाबीजच्या अधिकाऱ्यांनी अर्थ काढला की या नोटा चालणार नाही. त्यामुळे महाबीजमध्ये बियाण्यांची विक्री बंद करावी. त्यामुळे महाबीजच्या काही 'हुशार' अधिकाऱ्यांनी बियाणं विक्री केंद्रचं बंद केलीत.
याबाबत माहिती मिळताच मुख्य सचिवांनी केला हस्तक्षेप केला. त्यांनी कृषी विभाग आणि महाबीज यांना केला संपर्क केला. कृषी विभागाने महाबीजला सांगितलं बियाणं खरेदीसाठी 500 आणि 1000 नोटा चालणार आहेत, असा त्या परिपत्रकाचा अर्थ होत आहे. जुन्या नोटा चालणार नाहीत असा अर्थ होत नाही.
त्यामुळे महाबीजने तात्काळ बियाणं विक्री सुरू करावी असे आदेश मुख्य सचिवांनी महाबीजला दिले. परिपत्रक वाचण्यात झाली गफलत महाबीजने देखील मान्य केली आहे.