महाड : केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केली. हे काम रखडल्यानं रायगडकरांना त्रास झाल्याबददल दिलगिरी व्यक्त केली. त्याचवेळी कामाची गती आता वाढल्यानं समाधान व्यक्त केलं.
आतापर्यंत पहिल्या टप्प्याचं 47 टक्के काम पूर्ण झालंय. मुंबई ते गोवा पर्यंतच्या कामासाठी 20 हजार कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित असून हे काम डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण होईल असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
हा महामार्ग ग्रीन हायवे करण्यात येणार असून रस्त्याच्या दुतर्फा तसेच मध्यभागी झाडे लावण्यात येणार आहेत. प्रकल्प खर्चाच्या 1 टक्के रक्कम यावर खर्च केली जाणार असून झाडे वाचवण्याच्या दृष्टीने मोठया झाडांचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे.