मुंबई : अवयवदानामध्ये महाराष्ट्राला 'बेस्ट परफॉर्मिंग स्टेट' हा पुरस्कार मिळाला आहे.
मोदींनी 'मन की बात' मध्ये अंगदान'चा उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रानं १ ऑगस्ट रोजी 'महाअवयवदान अभियान' हाती घेतलं होतं.
या अभियानाला महाराष्ट्र राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्तानं आज या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.