नागपूर : नीटच्या परीक्षेवरून उद्धवलेल्या वादावर भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी काहीसा वेगळा उपाय शोधलाय. देशाच्या शिक्षणव्यस्थेत सूसूत्रता आण्याची असेल, तर संपूर्ण देशात एकच बोर्ड असायला हवा, असं मत भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी व्यक्त केलंय.
देशात सुमारे 33 बोर्ड आहे. त्यात प्रत्येकाचा दर्जा वेगळा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पातळीतही मोठी तफावत येते. ही तफावत अत्यंत धोकादायक असल्याचं वरुण गांधींनी नागपुरात म्हटलं. याविषयी आपण सरकारकडे तक्रार करणार असल्याचंही गांधींनी यावेळी स्पष्ट केलं. नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित एका शिबिरात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.