नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मार्चपासून आंब्याचा सीझन सुरु होतो. मात्र, यावर्षी फेब्रुवारीमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. पेटीला चार ते पाच हजार रुपये भाव मिळाला आहे.
उत्पन्न बाजार समितीत रोज 100 ते 150 पेट्या येत आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधून हा आंबा आला आहे. तसेच कर्नाटकी हापूसही दाखल झाला आहे. मार्च महिन्यात आंब्याच्या 80 हजार ते एक लाख पेट्या दाखल होतील, असा अंदाज आहे.
मात्र, आतापासून आंबा सीझन सुरु झाला असल्याचं मत व्यापारी व्यक्त करतायत. महाराष्ट्राचा हापूस 800 ते 1000 रुपये डझन विकला जातोय. तर एक पेटी चार ते पाच हजाराला विकली जातेय.