नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धडकणार मराठा मोर्चा

हिवाळी अधिवेशनात नागपूरला मराठा मोर्चाचं वादळ धडकणार आहे. 14 डिसेंबरला मराठा क्रांती मोर्चा नागपुरात निघणार आहे. 

Updated: Dec 3, 2016, 07:31 PM IST
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धडकणार मराठा मोर्चा title=

पुणे : हिवाळी अधिवेशनात नागपूरला मराठा मोर्चाचं वादळ धडकणार आहे. 14 डिसेंबरला मराठा क्रांती मोर्चा नागपुरात निघणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. अधिवेशन काळात प्रश्न न सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या दोषींना फाशी या मागणीसाठी मराठा समाजाकडून राज्यभरात मोर्चे काढण्यात येत आहेत.