पुणे : मॉन्सून वेगाने पुढे सरकतोय, रविवारपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. कोकण-गोवा, मराठवाडा, विदर्भात मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी बुधवारपर्यंत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
महाराष्ट्रासह उत्तर अरबी समुद्र, दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दक्षिण ओडिशा आणि वायव्य बंगालच्या उपसागरात आणखी काही भागांत मॉन्सूनने प्रवेश केला आहे.
गुजरातमधील वेरावळ, सुरत, मध्य प्रदेशमधील उज्जैन, नरसिंगपूर, छत्तीसगडमधील रायपूर, तर पूर्व भारतातील कृष्णानगर आणि दार्जिलिंगपर्यंत मॉन्सूनने मजल मारली आहे. मोसमी पावसाची उत्तरी सीमा आणखी उत्तरेकडे सरकली आहे.
मॉन्सून पुढील तीन दिवसांत उत्तर अरबी समुद्र, गुजरात, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा उर्वरित भाग, वायव्य बंगालच्या उपसागर आणि पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओडिशा आणि मध्य प्रदेश आणि झारखंड, बिहारच्या काही भागात दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.