मुंबई : मागच्या वर्षी म्हणावा तसा पाऊस न बरसल्यामुळे यावर्षी मात्र चांगला पाऊस पडावा यासाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. व्हॉट्स अॅपवरही वरुण राजाला आवाहान करणारा एक मेसेज व्हायरल झाला आहे.
ट्रेन बंद झाल्या तरी चालतील तू मात्र अधीर आणि बधिर होऊन बरस,
रस्त्यावर पाणी भरलं तरी चालेल तू गुडघ्याला बाशिंग बांधून कोसळ,
नदीला पूर आले तरी चालेल तू तराट होऊन बांधावरुन कल्टी मारुन पड,
शाळा,कॉलेज बंद झाले तरी चालेल तू टेक्नो वरात घेऊन बरस, आणि करुन टाक महाराष्ट्रात झिंगझिंगझिंगाट...