मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवरची वाहतूक कोंडी फोडणार ही नवी पद्धत

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता, नव्या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. 

Updated: Aug 16, 2016, 06:08 PM IST
मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवरची वाहतूक कोंडी फोडणार ही नवी पद्धत
छाया : डीएनए

मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता, नव्या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. 

स्मार्ट नेटवर्क ऑफ ट्राफिक मॅनेजमेंट नावाची ही व्यवस्था असणार आहे. या व्यवस्थेअंतर्गत वाहतूक पोलीस, सीसीटीव्ही आणि नियंत्रण कक्षाच्या मदतीने मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरच्या वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवलं जाणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत फिक्कीच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. या व्यवस्थेमुळे एक्स्प्रेस वेवरच्या वाहतुकीची अत्यंत ताजी माहिती लगेचच समजू शकणार आहे. 

विशेष म्हणजे या मार्गावरुन प्रवासा करणाऱ्या प्रवाशांनाही ही माहिती दिली जाणार आहे. यामुळे झालेली वाहतूक कोंडी आणि त्यानुसार वाहतूक वळवणे, शक्य होणार आहे.