नागपूर: उपराजधानी नागपुरच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या मेट्रो रेल्वेचं बांधकाम आजपासून सुरु होत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली.
यात मेट्रोचे दोन कॉरिडोर असणार असून पहिल्या टप्प्यात उत्तर-दक्षिण कॉरिडोरचं बांधकाम होणार आहे. हे कॉरिडोर खापरी मिहान इथं असेल. नागपूर मेट्रो पूर्ण होण्यासाठी ७ वर्षांचा कालावधी अपेक्षित असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ८,६८० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
नागपूरच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा असा नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या बांधकामला आज खऱ्या अर्थानं सुरवात होतेय. मेट्रोच्या पहिल्या टप्पयाच्या कामाचा शुभारंभ आज होतो आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.