इगतपुरी: इगतपुरीजवळ एका घरात आज पहाटे बिबट्या शिरला होता. मुंढे गावात ही घटना घडलीय. तब्बल ५ दिवसांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलंय.
नागरिकांनी या बिबट्याला घरात कोंडून ठेवलं होतं. बिबट्याला पकडण्याचे गावकऱ्यांच्या साथीनं प्रयत्न सुरू होते. अखेर ५ तासांनंतर त्यांना यश आलं. इंजेक्शन देऊन वनविभाग अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केलं.
नाशिक जिल्ह्यात बिबट्या मानवी वस्तीत येण्याचे प्रकार वारंवार घडतांना दिसतायेत. त्यावर वनविभागानं उपाय करण्याची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.