नवी मुंबई : नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निकालानंतरचा जल्लोष करण्यात येत आहे. नवी मुंबईत घराणेशाहीचा पुन्हा एकदा विजय झालाय. बदलापूर आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले. तर औरंगाबादमध्ये सहाव्यांदा महापालिकेवर भगवा फडकणार आहे.
मुंबईत गेल्या २० वर्षांपासून एकहाती सत्ता राबवणा-या राष्ट्रवादीच्या गणेश नाईकांचेच वर्चस्व पुन्हा सिद्ध झालंय. राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी अपक्षांच्या मदतीनं नाईक आपला सत्तेचा झेंडा फडकवत ठेवतील असं चित्र दिसतंय. नवी मुंबईत राष्ट्रवादीने ५२ जागा जिंकल्या आहेत तर शिवसेना भाजप-शिवसेनेनं युती केली खरी मात्र नाईक यांना रोखण्यात त्यांना अपयश आलंय. नवी मुंबईत शिवसेनेच्या जागा दुपटीनं वाढलेल्या आहेत. तर भाजपच्याही जागा वाढल्या आहेत.
नवी मुंबई महापालिकेकडे सर्वांचंच लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं. महत्त्वाच्या अशा नवी मुंबई महापालिकेत गेल्या २० वर्षांपासून एकहाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश नाईकांचीच राहिली आहे. याही निवडणुकीत गणेश नाईक यांचंच वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय. नवी मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामात १११ पैकी ५३ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष ठरलाय. बहुमताचा ५६ हा जादुई आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला अपक्ष किंवा काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे.
शिवसेनेनं मुसंडी मारलीं खऱी पण भाजपचा प्रभाव न पडल्यानं नवी मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्याचं युतीचं स्वप्न अपुरचं राहिलयं. भाजप -शिवसेनेनं युती केली खरी मात्र नाईक यांना रोखण्यात त्यांना अपयश आलंय. नवी मुंबईत शिवसेनेच्या जागा दुपटीनं वाढलेल्या आहेत. तर भाजपच्याही जागा वाढल्या आहेत.
नवी मुंबई महापालिकेवर अखेर गणेश नाईक यांचाच वरचष्मा राहणार हे स्पष्ट झालयं. बहुमताचा ५६ हा जादुई आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला अपक्ष किंवा काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. शिवसेनेनं मुसंडी मारलीं खऱी पण भाजपचा प्रभाव न पडल्यानं नवी मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्याचं युतीचं स्वप्न अपुरचं राहिलयं.
नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक मतं मिळवली आहेत. सत्ता स्थापनेसाठी अपक्ष संपर्कात असल्याचं राष्ट्रवादीचे नेते, गणेश नाईक यांनी सांगितलंय. त्याचवेळी काँग्रेस सोबत आली तर काँग्रेसला घेऊन सत्ता स्थापणार असल्याचंही गणेश नाईक यांनी स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.