पुणे : सायली वांजळेला पुण्याची सगळ्यात लहान नगरसेविका व्हायचा मान मिळाला आहे. २२ वर्षांच्या सायलीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर ही निवडणूक लढली होती. सायली ही मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळेंची मुलगी आहे. पुण्यातील वारजे माळवाडी प्रभाग क्रमांक ३२ मधून सायलीचा विजय झाला आहे.
सर्वात लहान नगरसेविकेबरोबरच आणखी एका कारणामुळे सायली चर्चेत आली आहे. राजकारणामध्ये सक्रीय होण्याआधी सायलीनं तब्बल ६० किलो वजन कमी केलं. प्रचारावेळी ११६ किलो वजन असलेल्या सायलीनं आता ६० किलो वजन घटवलं आहे. प्रचार करताना प्रत्येक घरी जाताना मी लिफ्टऐवजी जिन्याचा वापर केला. याचा मला वजन कमी करण्यासाठी फायदा झाल्याचं सायली म्हणाली आहे.