मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीतल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळात उमटले. विधानसभेचे कामकाज सुरु होताच काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी स्थगन प्रस्ताव आणला. पण हा स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यात आला नाही.
मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर जायला वेळ आहे, पण कोपर्डीमध्ये जायला वेळ नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. हे सरकार ट्विटरवर चाललं आहे. सरकार आमच्या सदस्यांना बलात्कारासारख्या गंभीर घटनेवर चर्चा करू देत नाही, असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. मंगळवारीही याबाबत स्थगन प्रस्ताव आणणार असल्याची प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे.