नाशिक : नाशिकमधील महाकवी कालिदास कला मंदिराच्या दुरवस्थेची महापालिका आयुक्त अशिषेक कृष्ण यांनी दखल घेतलीय. या प्रकरणी चार अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलीय.
अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अधीक्षक अभियंता यू बी पवार, आरोग्य अधिकारी डॉ विजय डेकाटे आणि साहाय्यक आयुक्त मालिनी क्षीरसाठ यांना आठवडाभरात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाट्यअभिनेते प्रशांत दामले यांनी कालिदास कला मंदिराच्या दुरवस्थेची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली होती, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.