वसई : वसईच्या एव्हरशाइन परिसरातील सॅविओ सोसायटीत एसी कॉम्प्रेसरच्या शॉटसर्किटमुळे आग लागून झालेल्या दुर्घटनेत एकाचा दुर्देवी मृत्यू झालाय.
या सोसायटीतील ए विंग मधील रूम नंबर 203 मध्ये आज पहाटे साडे पाच वाजताच्या दरम्यान ए.सी. च्या कॉम्प्रेसरमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीमुळे संपूर्ण खोलीत धूर झाला.
पाहुणे म्हणून आलेले जयंत देशकर यांच मात्र यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ए.सी.चा धूर हा वरच्या मजल्यावरील 303 या रूममध्ये गेल्याने या राहाणारे उदय मोहन कांचे त्यांचा 9 महिन्याचा मुलगा पारसधुरामुळे बेशुद्ध पडलाय.