नागपूर : नागपूरच्या ओपन जेलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक कैदी फरार झालाय. शमला शिसवाह असं या आरोपीचं नाव आहे. शमाल हा मूळचा पश्चिम बंगालचा आहे. नागपूरच्या ओपन जेलमध्ये शिक्षा भोगणारा शमाल शिसवाह दुपारपासून गायब झालाय. फरार शमालचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
एक दीड वर्षांपूर्वी नागपूरच्या मध्यवर्ती जेलमधून पाच कैदी पळाले होते. मात्र आता पुन्हा एकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ओपन जेलमधून कैदी फरार झालाय. त्यामुळे आधीच्या घटनेनंतरही कारागृह प्रशासनाचे डोळे उघडले नसल्याचे समोर आलंय.