पुणे : पुण्यात पहिल्यांदा बॉम्बस्फोट झाला होता, तेव्हा पुणेकरांना आश्चर्य वाटलं होतं, पण पुण्यात आतापर्यंत पाच ठिकाणी स्फोट झाले आहेत.
पुण्यात 13 फेब्रुवारी 2010 रोजी झालेला बॉम्बस्फोट हा सर्वात मोठा स्फोट हानीकारक होता. या बॉम्बस्फोटामुळे पुणं हादरलं होतं.
पाहा पुण्यात आतापर्यंत झालेले स्फोट
13 फेब्रुवारी २०१०
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट
१७ ठार ६० जखमी
१ ऑगस्ट २०१२
जंगली महाराज रोडवर
चार कमी तीव्रतेचे स्फोट
१ ऑगस्ट २०१२ ला
बालगंधर्व, मॅक्डोनाल्ड,
देना बँक,डेक्कनमध्ये स्फोट
१७ ऑगस्ट २०१२ ला
पिंपरी-चिंचवडमध्ये कमी
तीव्रतेचा स्फोट, १ जखमी
१० जुलै २०१४
विश्रामबाग पोलीस स्टेशन
पार्किंगमध्ये स्फोट
कमी तीव्रतेच्या स्फोटात
३ किरकोळ जखमी
कधी आणि कसा झाला स्फोट ?
- 2 वाजून २ मिनिटांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या पार्किंगमध्ये स्फोट
- दगडूशेट मंदिरापासून १५ ते २० मीटर अंतरावर स्फोट
-MH -११ – ८७७१ नंबरच्या स्प्लेंडरमध्ये स्फोट, ३ जखमी
- पोलीस स्टेशन समोरच असल्यानं तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल
- BDDS कडून घटनास्थळाची तपासणी
- पोलीस आयुक्त सतीश माथुर घटनास्थळी दाखल
- पोलीस आणि BDDS पुरावे जमा करण्याचं काम सुरू
- घटनास्थळी खिळे, छर्रे सापडले
- स्फोटासाठी स्फोटकांचा वापर झाल्याचंही उघड
- स्फोट जाणीवपूर्वक घडवण्यात आल्याचं निष्पन्न
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.