पुणे : राज्यात सत्तेत आल्यावर पुण्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्यांची भाषा बदलली आहे. कालव्यातून पाण्याची गळती होत असेल तर, त्याची दुरुस्ती महापालिकेनंच करायला हवी. असं म्हणत पाणी पुरवठा बंद होण्यासाठी महापालिकाच जबाबदार असल्याचा ठपका पालकमंत्री गिरीश बापट यांनी ठेवलाय.
चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसाठी २२०० कोटी बॉण्ड मधून उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेनं फेटाळला. त्यामुळं पाणी पुरवठा बंद केला का? या प्रश्नावर असे निर्णय घ्यायला मी चिल्लर नेता नाही. अशी प्रतिक्रिया बापट यांनी दिली.