नाशिक: नाशिकमध्ये लष्करी जवान आणि पोलिसांमध्ये जोरदार राडा झालाय. लष्करी जवानांनी गुंडगिरी करत नाशिक उपनगर पोलीस स्टेशनवर हल्लाबोल केलाय. संपूर्ण पोलीस स्टेशनची तोडफोड केलीय. तसंच पोलिसांना अवार्च्य शिवीगाळही केलीय.
काल सायंकाळी पोलीस ठाण्याच्या आवारातून गाडी काढण्यावरून लष्करी अधिकारी आशिष बागुल आणि एका पोलीस अधिकाऱ्यात वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी लष्करी अधिकारी आणि त्याचा नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला.
हा गुन्हा मागे घेण्यासाठी भाजपनं आज सकाळी उपनगर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन देखील केलं होतं. मात्र आपल्या अधिकाऱ्याला झालेल्या धक्क्बुक्कीचा सूड उगविण्यासाठी शंभर ते दीडशे जवान पोलीस ठाण्यावर चाल करून गेलेत आणि त्यांनी पोलीस ठाण्याची तोडफोड केली.
पोलीस स्टेशनची तोडफोड करणाऱ्या लष्करी जवानांनी महिला पोलीस कर्माचाऱ्यांनाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. मारहाण झाल्याचा आरोप करणाऱ्या शिल्पा काळे या महिला पोलीस कर्मचाऱ्यानं केलाय.
एकूणच समाजाच्या रक्षकांनीच असा धुडगूस घातल्यानं नाशिकमध्ये संतापात वातावरण पसरलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.