मराठवाड्यात मुलाखतींदरम्यान राज ठाकरेंची तब्येत बिघडली

मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे. त्यामुळं काही काळासाठी या मुलाखती थांबवण्यात आल्या असून विश्रांतीसाठी राज ठाकरे हॉटेलवर गेले आहेत.

Updated: Sep 15, 2014, 11:05 PM IST
मराठवाड्यात मुलाखतींदरम्यान राज ठाकरेंची तब्येत बिघडली title=

औरंगाबाद: मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे. त्यामुळं काही काळासाठी या मुलाखती थांबवण्यात आल्या असून विश्रांतीसाठी राज ठाकरे हॉटेलवर गेले आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे इच्छुकांच्या मुलाखती घेत असून सकाळी ११ वाजल्यापासून औरंगाबाद इथं हा कार्यक्रम सुरू होता. मात्र काही वेळानंतर ठाकरे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी हॉटेलवर जाऊन विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.

२५ सप्टेंबर रोजी राज ठाकरे त्यांची बहुप्रतिक्षित 'ब्लू प्रिंट' सादर करणार आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.