नाशिक : दिल्ली निर्भया प्रकरणाला ३ वर्ष पूर्ण झालीत. त्या घटनेचे देशभर पडसाद उमटले होते. मात्र त्यानंतरही महिला, मुली सुरक्षित नाहीतच. नाशिक शहरात घडलेल्या घटनेतून हेच जळजळीत वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय.
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय भागातच रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील १२ वर्षांच्या मुलीला रात्री उचलून नेऊन दोघा नराधमांनी तिच्यावर शौचालायात बलात्कार केला. या प्रकरणी चंद्रकांत वाघमारे आणि रवी वाघमारे या दोघा भावांना पोलिसांनी तत्काळ अटक केली.
जिल्हा न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. पिडित अल्पवयीन मुलीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून, अत्याचाराच्या धक्क्यातून नाशिकची ही निर्भया अजून सावरलेली नाही.