व्हिडिओ : दारूची बाटली घेऊन कामावर तलाठ्याचा धिंगाणा

 सांगली जिल्ह्यातील चोरोची गावात एका तलाठ्यानं दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याची घटना घडलीय.

Updated: Dec 4, 2015, 02:03 PM IST

 
सांगली :  सांगली जिल्ह्यातील चोरोची गावात एका तलाठ्यानं दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याची घटना घडलीय.

कांतिलाल साळुंखे असं नाव असलेला हा तलाठी थेट दारुची बाटली हातात घेऊन कामावर हजर होता. दारुच्या नशेत असलेल्या या तलाठ्यानं कार्यालयावर दगडफेक करत दरवाजाची मोडतोडही केली. 

विशेष म्हणजे कार्यालयात खुलेआम हातात दारुची बाटली पकडणा-या या तलाठ्यानं राज्य सरकार दारुबंदी का करत नाही असा उलट सवाल केला आणि कोतवालासह ग्रामस्थांना शिवीगाळ केली. 

दारुच्या नशेत या कांतीलाल सांळुखेनं ग्रामस्थांची चांगलीच करमणूक केली. नरेंद्र मोदी, एकनाथ खडसे, राज्य आणि केंद्र सरकारलाही त्यानं दारुच्या नशेत अनेक प्रश्न उपस्थित करत बघ्यांचं एकप्रकारे त्यानं मनोरंजनच केलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.