नाशिक : बनावट नोटा छापल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा पदाधिकारी छबू नागरे आणि त्याच्या ११ साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केल्याने पक्षाची चांगलीच बदनामी झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. नोटा छापणाऱ्या छबूला फासावर लटकवा, अशी मागणी पवारांनी केली आहे.
आगामी निवडणुकीत विरोधक याचंच भांडवल करणार हे लक्षात आल्यामुळ शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतलीय. छबूला फासावर लटकवण्याची मागणी पवारांनी केलीय. नाशिकमध्ये नोटा छापणारी एक प्रेस नाही तर दोन होत्या एका घरात चालत होती असं पवार म्हणाले.
बनावट नोटा छापणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश झाल्याने नाशिक शहरात एकाच खळबळ उडली. राष्टवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांसह १२ जणांची आता मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलीय. मात्र गेल्या वर्षभरात नाशिक शहरातील विविध बँकामध्ये हजारो रुपयांचा बनावट नोटांचा भरणा झाल्याचं उघडकीस आले आहे.