सागर शेजवळ हत्या प्रकरणाचा उलगडा, नऊ आरोपी जेरबंद

शिर्डीतल्या सागर शेजवळ हत्या प्रकरणाचा उलगडा झालाय. मोबाईल फोनच्या रिंगटोनच्या वादातून ही हत्या झाल्याचं उघड झालंय. पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी याची कबुली दिलीय. शिर्डीतील गुंड प्रवृत्तीच्या विशाल कोते आणि त्याच्या साथीदारांनी अमानुष मारहाण करत अपहरण करून शिंगवे गावातील निर्जन परिसरात त्याची दगडानं ठेचून निर्घुणपणे हत्या केली. 

Updated: Nov 15, 2015, 10:34 PM IST
सागर शेजवळ हत्या प्रकरणाचा उलगडा, नऊ आरोपी जेरबंद title=

शिर्डी: शिर्डीतल्या सागर शेजवळ हत्या प्रकरणाचा उलगडा झालाय. मोबाईल फोनच्या रिंगटोनच्या वादातून ही हत्या झाल्याचं उघड झालंय. पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी याची कबुली दिलीय. शिर्डीतील गुंड प्रवृत्तीच्या विशाल कोते आणि त्याच्या साथीदारांनी अमानुष मारहाण करत अपहरण करून शिंगवे गावातील निर्जन परिसरात त्याची दगडानं ठेचून निर्घुणपणे हत्या केली. 

बियर शॉपच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मृत सागरला फरफटत नेत असल्याचं समोर आलं होतं. पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर किरण आजबे आणि धनंजय काळे या आरोपींनीच सागरच्या हत्येची कबुली दिलीय. आम्ही दहशतीखाली जगत असून आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्याची मागणी सागरच्या कुटुंबीयांनी केलीय. 

सागरच्या हत्येनंतर शिर्डी पोलिसांत आरोपींच्या विरोधात अपहरण, हत्या, अॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार विशाल कोते, रुपेश वाडेकर याला गोव्यातून तसंच सुनील जाधव या आरोपीला पुण्यातून ताब्यात घेतलंय. या प्रकरणातील नऊ आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय.

आणखी वाचा - तुम्हीही स्मार्टफोन खिशात ठेवता, सावधान...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.