जळगाव : राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करतांना शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
खडसेंच अनुदान चार तासात मंजूर?
जळगाव जिल्ह्यात पॉलीहाऊस करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेवर अनुदान मिळत नाही, पण खडसेंचं अनुदान चार तासात मंजूर होतं. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणवणारे राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसेंनी एकाच दिवसात पॉली हाऊससाठी लाखो रुपयांचे अनुदान लाटले.
खडसेंनी त्यांच्या गावात एकाच दिवसात, मुक्ताईनगर एज्युकेशन सोसायटीच्या नावे २० एकरचा खुला भूखंड मिळवल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केलाय.
म्हणून खडसेंचा तिळपापड- गुलाबराव पाटील
धरणगाव तालुक्यातील भाजपच्या पी.सी.पाटलांसह इतर कार्यकर्त्यांनी केलेल्या पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचारावर मी बोलल्यामुळेच एकनाथ खडसेंचा तिळपापड झाला, खडसेंना या गैरव्यवहारांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश द्यावे लागले असल्याचं आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
शांताबाईचं नाव घ्यायला मी शांताराम नाही- गुलाबराव
आमदार गुलाबराव पाटील पुढे बोलतांना म्हणाले, मला मंत्रिपद मिळण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाची शिफारशीची मुळीच गरज नाही आणि शांताबाईचे नाव घेण्यासाठी मी शांताराम देखील नाही, असा टोला शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
आरोप चुकीचे असल्यास सिद्ध करा, आमदार पाटलांचा खडसेंना चॅलेन्ज
माझे आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध केल्यास आपण त्यांची जाहीर माफी मागण्यास तयार आहे, खडसेंनी लाखोंचे अनुदान लाटले २० एकरचा भूखंड मिळवला असा माझा थेट आरोप आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.