मुंबई : राज्यातील सत्तेत असलेल्या भाजप सेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रदर्शन कांग्रेसने भरवलं होतं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नरीमन पॉइंट इथल्या कांग्रेस कार्यालयात भरवलेल्या प्रदर्शनाचे उद्धाटन केले. भाजप सेनेच्या 13 भ्रष्ट मंत्र्यांची पोलखोल या प्रदर्शनाच्या माध्यमातून केली आहे.
काँग्रेसच्या या प्रदर्शनाचा कांद्यानं वांदा केला. काँग्रेसनं भरवलेल्या मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या पुराव्याच्या प्रदर्शनाच्या ठिकाणीच मोफत कांदा वाटप सुरू केलं होतं. मात्र प्रदर्शनाला भेट देण्यापेक्षा मोफतचा कांदा घेण्यासाठीच लोकांनी रांगा लावल्या होत्या. काँग्रेसनं अभिनव प्रदर्शन भरवलं खरं मात्र त्याच ठिकाणी कांदा मोफत दिल्यानं प्रदर्शनाचा वांदा झाल्याचं चित्र दिसलं.