चिंचवडमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

 इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहेे. दिवाळीच्या सुट्टीनंतर गावाकडून खासगी हॉस्टेलवर परतलेल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय.  प्रेमप्रकरणातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. वाल्हेकरवाडी गुरुद्वारा रोड येथे सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.

Updated: Nov 18, 2015, 12:22 AM IST
चिंचवडमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या title=

पिंपरी-चिंचवड :  इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहेे. दिवाळीच्या सुट्टीनंतर गावाकडून खासगी हॉस्टेलवर परतलेल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय.  प्रेमप्रकरणातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. वाल्हेकरवाडी गुरुद्वारा रोड येथे सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.

विशाल सोनवणे असे आत्महत्या केलेल्या २२ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. विशाल हा डॉ. डी. वाय. पाटील विद्यालयात इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला होता. तो मूळचा मनमाडचा होता.

विशालजवळ जवळ चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये मनमाड येथील प्रेमप्रकरणाचा उल्लेख आहे. त्यामुळे प्रेमप्रकरणातूनच विशाल याने आत्महत्या केली असावी असा अंदाज चिंचवड पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दिवाळीच्या सुट्टीसाठी विशाल शुक्रवारी मनमाडला गेला. त्यानंतर तो सोमवारी सकाळी वाल्हेकरवाडी येथे परत आला. मात्र विशाल दार उघडत नसल्याने अन्य विद्यार्थी व पोलिसांच्या मदतीने दार उघडले. तेव्हा विशालने फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे उघड झाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.