नागपूर: नागपुरात पोलिसांनी केलेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या कारवाईत तब्बल १०२ शस्त्रं जप्त करण्यात आलीयेत. मोमीनपुरा भागात झालेल्या या कारवाईत मोहम्मद नईम नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय.
ही सर्व शस्त्र मुंबईहून नागपूरला आणली गेल्याचंही निष्पन्न झालंय. त्यामुळं यामागे एक मोठं रॅकेट असण्याची शक्यता बळावलीय. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी एका दुकानावर घातलेल्या छाप्यात १ तलवार, ३१ खंजीर, ८ कुकरी, ४३ चाकू, १४ सुरे आणि ५ गुप्ती हस्तगत करण्यात आल्यात.
याखेरीज ४ लाख ७० हजारांची रोख रक्कमही आढळलीय. नागपूरमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमिवर या कारवाईला महत्त्व प्राप्त झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.