लोणावळा : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जात असलेलं महाबळेश्वर कडाक्याच्या थंडीनं गारठलं असून वेण्णा लेक परिसरात ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
वेण्णा लेक परिसरात आज पहाटे हिमकण जमा झाले होते. सलग ४ दिवस सुट्ट्यामुळे देशभरातून हजारो पर्यटक महाबळेश्वर मध्ये दाखल झाले आहेत. सध्या पर्यटक गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आहेत.
तर निफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडमध्ये पारा 6.4 अंशांवर गेला आहे. तर विदर्भातही थंडीचा कडाका कायम आहे. अमरावतीमध्ये 9.8 अंश सेल्सीयस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.