गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील 'भडंगा' या गावात राहणा-या ग्यानिराम सोनटक्के यांचा शेती हा मुख्य व्यवसाय. या शेतकऱ्याला जमीन मोजणी करिता वनकर्मचाऱ्यांनी लाच म्हणून सुरुवातीला पैसे मागितले.
इतकंच नाही तर पैशावर सुद्धा संतुष्ट न राहता त्यांनी शेतकऱ्याचा एकुलत्या एक कोंबड्यावर देखील ताव मारला. त्यामुळे कायद्याची कुठलीही माहिती नसणाऱ्या ग्यानिराम सारख्या शेतकऱ्याची दंडाच्या नावावर फसवणूक करून लुबाडणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता वन विभाग काय कारवाई करणार हे पाहाणं औत्सुक्याचं आहे.